सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकांच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. विधानसभा अध्यक्ष 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर करु शकले नाहीत तर कोर्टाला वेळापत्रक ठरवावे लागेल, असा इशाराही कोर्टाने दिला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांना ही शेवटची संधी असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यासोबत याच आठवड्यात चर्चा करणार आहेत. यावेळी ते वेळापत्रक ठरवण्याबाबत महत्त्वाचा सल्ला घेणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष दसऱ्यानंतर देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांचीही घेणार भेट घेणार आहेत.
दरम्यान, आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरची पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आले. 34 वेगवेगळ्या याचिका आता यापुढे 6 याचिकेत मांडल्या जातील.