भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दसऱ्यानिमित्त सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरून जाहीर सभा घेतली. या सभेला हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. कडक उन्हात घेतलेल्या या सभेत पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले ,
शिवशक्ती परिक्रमेला जनतेने मला चांगला प्रतिसाद दिला, अतोनात प्रेम दिलं आणि अशा या जनतेला, गोरगरिबांना न्याय मिळवून देणारच,असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.पंकजा मुंडे दुसऱ्या पक्षात जाणार, पक्ष सोडणार असे प्रश्न मला विचारले जातात. पंकजा मुंडेची निष्ठा इतकी लेचीपेची नाही. देवांनादेखील हार पत्करावी लागली, असेही त्या म्हणाल्या. नितीमत्ता बाजुला ठेवून राजकारण करु शकत नाही, असे म्हणत त्यांनी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा दाखला दिला.
मला काही मिळो न मिळो पण पुढची पिढी गोड जेवण जेवेल यासाठी मी माझं आयुष्य खर्ची घालणार आहे.” असा निर्धार यावेळी पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला आहे. दसरा मेळाव्यात बोलताना , पंकजा मुंडेंनी निर्धार केला आहे. मी थकणार नाही, , मी कुणासमोर कधी झुकणार नाही, अशी घोषणा करत माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.