मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारला त्यांच्या मागणीनुसार आम्ही 40 दिले होते. मग आतापर्यंत आरक्षण का देण्यात आले नाही. ? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. हे उपोषण कुठलेही अन्न-पाणी आणि वैद्यकीय उपचार न घेता केलं जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला आज ४१ दिवस झाले. सरकारने कोणतीच हालचाल केली नसल्याने, आपण स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरू करत आहोत. महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावेत यासाठी हे दुसरे आमरण उपोषण करत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान हे आमरण उपोषण टाळण्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोन संपर्क करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्री. जरांगे आंदोलनावर ठाम राहिले आहे.