यावेळी राधानगरी तालुक्यातील आडवाटेवरचे, अभयारण्यालगतचे एक छोटेसे गाव असलेल्या पाटपन्हाळामध्ये दुर्गाष्टमी अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली. या गावामध्ये केवळ ७वी पर्यंत शाळा आहे.
पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जवळचे हायस्कूल ३ किमी अंतरावर असलेल्या फराळे गावात, पण जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नाही.. विद्यार्थ्यांची, विशेषतः मुलींची हि समस्या सोडवण्यासाठी आपल्या भोगावती सांस्कृतिक मंडळ या संस्थेने या गरजू मुलां- मुलींसाठी सायकल भेट देण्याचा निर्णय घेतला.
Tags: NULL