आयसीसी विश्वचषक २०२३ चा २४ व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील दावेदार मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर नेदरलँड्स या विश्वचषकात आणखी एक मोठा धक्का देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो,
दरम्यान आजच्या सामन्याची नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने 5 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये 4 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.तर दुसऱ्या बाजूला नेदरलँड्सने 4 पैकी फक्त एकच सामन्यात विजय मिळवला आहे नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला गुंडाळून झटका दिला आणि पहिला विजय साजरा केला. नेदरलँड्स एकमेव विजयासह सातव्या स्थानी आहे. आता या सामन्यात नेदरलँड्स कांगारुं विरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे लक्ष असणार आहे.