पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, २६ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत दुपारी १ वाजता दाखल होणार आहेत. त्यानंतर ते साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन मंदिरात पूजाही करणार आहेत. दिवसभर सामान्य भक्तांना साईमंदिरात दर्शन नियमितपणे सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीतील साई मंदिराला भेट देणार असल्याने केवळ अर्धा तास मोदी आल्यानंतर समाधी मंदिरात प्रवेश बंदी असणार आहे.
पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावेळी महाराष्ट्रातील जनतेला मोठी भेट देणार आहेत.या वेळी शिर्डी साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान दुपारी २ वाजता निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कॅनलचे लोकार्पण करतील. त्यानंतर पंतप्रधान दुपारी ३.१५ वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. सुमारे ७ हजार ५०० कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी ६. ३० वाजता गोव्यासाठी रवाना होतील.