सातारा जिल्ह्यात सातारा व कराड या दोन ठिकाणी रविवार दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता राष्ट्र सेविका समितिचे सघोष पथसंचलने संपन्न झालीत.
*कराड* जिल्ह्यातील संचलनास नवीन कृष्णाबाई कार्यालय येथून सुरवात झाली . तेथून पुढे श्रीधर मुद्रणालय – दत्त मंदिर – उत्तर लक्ष्मी मंदिर – फडणीस सर – शिखरे – काळा मारुती – पाण्याची टाकी – पावसकर गल्ली – अनुग्रह – चावडी चौक – घाट – पंचवटी अशा भागातुन फिरून पुन्हा नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय येथे संचलनाची सांगता झाली .या संचलनात एकूण १०३ सेविकांनी संपूर्ण गणवेशात सहभाग घेतला होता. संचलनात चालणाऱ्या वाहिनीची संख्या ९० पैकी 19 जणी घोष गणात तर दंड गण संख्या १७ होती.
याप्रसंगी सौ. सुषमा ताई काळे (प्रांत सह सेवा प्रमुख), सौ.माधुरी ताई साने (विभाग बौद्धिक प्रमुख), सौ.स्वाती ताई भागवत (जिल्हा कार्यवाहिका) आदी अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी खूप उत्साहाने स्वागत केले अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला, रांगोळी काढून फुले उधळून स्वागत झाले.
*सातारा* जिल्ह्याचे संचलन हत्तीखाना शाळा येथून सुरू झाले. राजवाडा – मंगळवार तळे – बहुलेश्वर मंदिर – लक्ष्मीनारायण कार्यालय – डाॅ.हेडगेवार चौक – गोल मारूती मंदिर – डावीकडून यादोगोपाळ पेठ इ. मार्गाने पुन्हा हत्तीखाना शाला येथे समारोप झाला. सातारा येथील संचलनात एकूण १७६ सेविकांचा यामध्ये सहभाग होता. त्यापैकी वाहिनी संख्या १२९, घोष गण संख्या १९, दंड गण संख्या २२ होती.
Tags: NULL