पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते शिर्डीत पोचले आहेत. शिर्डी साईमंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यावेळी पाद्यपूजेसह साईदर्शन घेत आरतीही संपन्न झाली. यावेळी पीएम मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस येऊ देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या उद्घाटनासाठी पोहचले आहेत. याठिकाणी सुरवातीला मोदी यांनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टर द्वारे पाहणी केली. यानंतर त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन करण्यात आले.