केरळमधील ज्यू धर्मियांच्या एका सभेत आज जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील कोची येथील कलामासेरी येथील अधिवेशन केंद्रात झालेल्या सभेत जोरदार स्फोट झाला आहे. घटनास्थळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 35 जखमींना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मृत्यूची संख्या वाढू शकते. अधिवेशन केंद्रात यावेळी यहोवाची प्रार्थना चालू होती अशी माहिती समोर आली आहे.
दोनच दिवसांपूर्वी २७ ऑक्टोबरला केरळच्या मल्लपुरम येथे जमात-ए-इस्लामीची युवा शाखा ‘सॉलिडेरिटी यूथ मूवमेंट’ने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला होता. हमास रशीद मजल या हमास दहशतवादी संघटनेच्या नेत्याने या रॅलीला संबोधित केले. या मेळाव्यात ‘बुलडोजर हिंदुत्व आणि यहुदी उपटून टाक’ सारख्या घोषणा वाढविण्यात आली. या रॅलीच्या दुसर्या दिवशी म्हणजेच आज २९ ऑक्टोबर रोजी केरळमध्ये स्फोट झाला त्यामुळे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान केरळ पोलिसांनी हा आयईडी स्फोट असल्याची माहिती दिली आहे. याचा अर्थ हा एक दहशतवादी हल्लाच आहे याला दुजोरा दिला आहे.