साल १९४७ !ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचे नक्की केले !
पण …पण जाताना अतिशय तिरपी खेळी करून गेले.
तेव्हा ५६२ संस्थानिक अस्तित्वात होते या संस्थानिकांना त्यांनी तीन पर्याय दिले, पाकिस्तानात सामील व्हा, किंवा भारतात सामील व्हा किंवा स्वतंत्र राज्य म्हणून राहू शकता
खरं म्हणजे भारताचे तुकडे तुकडे करण्याची क्रूर चाल होती ती…
भारताच्या त्याकाळच्या चाणक्याने ही कुटनिती ओळखली आणि अतिशय चाणाक्षपणे पावले उचलून सगळ्या संस्थानिकांची मने वळवली आणि अनेक संस्थाने भारतात विलीन झाली.
हैद्राबाद मुक्ती संग्रामात सुद्धा महत्वाचे निर्णय घेऊन ते राज्यही भारतात विलीन घेऊन भविष्यातील मोठा पेच संपवला आणि खर्या अर्थाने ते लोह पुरुष ठरले
काश्मीर प्रश्न जर पटेलांकडे असता तर तो फाळणीनंतर लगेच सुटला असता असे त्यांच्या विरोधकांनाही वाटे यावरून त्यांच्या धडाडीची कल्पना यावी.
या देशाची एकसंधता, अखंडता कायम राहावी,भक्कम राहावी आणि येथील लोकशाही व्यवस्था बळकट व्हावी यासाठी अथक प्रयत्न करण्याचे त्यांचे कार्य अद्वितीय असेच आहे.
प्रखर देशभक्त, चतुर मुत्सद्दी आणि कठोर प्रशासक ही त्यांची तीनही रुपे आजही चकित करणारी आणि अत्यंत प्रभावशाली आहेत.
भारताच्या प्रशासकीय सेवेतील आय.ए .एस ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा. सरदार पटेलांनी या परीक्षेसाठी *भारतीय* *परीक्षा पद्धती* लागू केली.
खेडा येथील सत्याग्रह, बारडोलीतील सत्याग्रहाचे यशस्वी आयोजन आणि नेतृत्व, ह्या सत्याग्रहामुळेच त्यांना *सरदार* हे संबोधन मिळाले. त्यांनी 1930 च्या सुप्रसिद्ध दांडी यात्रेसाठी संपूर्ण जनजागृती केली. महात्मा गांधींच्या प्रत्येक लढ्यात ते अग्रगणी होते. त्यानंतरचा प्रदीर्घ तुरुंगवास आणि परत भारत छोडो आंदोलनात सहभाग होता . स्वतंत्र भारताचे ते पहिले उपपंतप्रधान होय.
अशा हजारो देश हिताच्या कार्यामध्ये ते सतत अग्रगणी होते.
त्यांच्या कार्याचे स्मरण भारत वासीयांना व्हावे या साठीच गुजरात येथे नर्मदा नदीच्या तीरावर एकतेचे प्रतीक “स्टॅच्यू ऑफ युनिटी “हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेले स्मारक उभारण्यात आले आहे
ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन म्हणतात
यही प्रसिध्द लोहे का पुरुष प्रबल
यही प्रसिध्द शक्तिकी शीला अटल
हिला इसे सका कभी न शत्रुदल
पटेलपर स्वदेश को गुमान है
जन्मदिनी त्यांना त्रिवार वंदन
शुभा कुलकर्णी
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र