राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्याला जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती मनोज जरांगे यांना दिली जाणार आहे. तसेच, त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण आठव्या दिवशीही सुरू आहे. यावर वेळीच तोडगा निघाला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
शिष्टमंडळाच्या भेटीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करणार आहेत. त्यानंतरच शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेतील.अतुल सावे, नारायण कुचे आणि संदीपान भुमरे हे जरांगेची भेट घेतील, सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना देणार आहेत.