विश्वकपचा ३३वा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी २ वाजता सुरू झाला आहे. भारताने या वर्ल्डकपमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेतील आतापर्यंत ६ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. तर श्रीलंकने ६ सामन्यांत २ विजय मिळाले आहेत. आता सेमी फायनलचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक आहे.
श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका संघाने भारताविरोधात एक बदल केलाय. धनंजय डिसल्वा याला आराम देण्यात आलाय. तर भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवण्यात आला आहे.
आतापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात ९ सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघ बरोबरीत आहेत. भारत आणि श्रीलंकेने प्रत्येकी ४ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
आज घरच्या मैदानावर आधीच फॉर्म मध्ये असलेली भारतीय टीम ह्या सामन्यात विजय मिळवेल ह्यात ह्यात शंकाच नाही.