वानखेडे मैदानात भारताने लंकेला अवघ्या ५५ धावांत गुंडाळत थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यंदाच्या विश्वचषकातील भारताचा हा सलग सातवा विजय आहे. भारताने या विजयासह गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केले आणि या विजयाबरोबरच भारतीय संघाने दिमाखात सेमी फायनल गाठली. भारत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.
आज भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या आहेत. ४९ धावांवर श्रीलंकेची नववी विकेट पडली. १७ चेंडूत १४ धावा करून कसून रजिता बाद झाला. शमीने त्याला स्लिपमध्ये शुभमन गिलकरवी झेलबाद केले. शामीने विश्वचषकात भारतासाठी एकूण ४५ बळी घेतले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे.