क्रिकेट वर्ल्डकपचा ३४वा सामना आज अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेदरलँडचा कर्णधार असलेल्या एडवर्ड्सने संघात एक बदल केला आहे. सलामीवीर विक्रमजीत सिंगच्या जागी वेस्ली बॅरेसीचा संघात समावेश केला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनेही एक बदल केला असून नवीन उल हकच्या जागी नूर अहमदला संधी मिळाली आहे.
अफगाणिस्तानचा संघ ६ सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर नेदरलँड्सने सहा पैकी दोन सामने जिंकले असून ते आठव्या क्रमांकावर आहेत. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.