ललित पाटील ड्रग प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील तरतुदी लावल्या आहेत. पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपासानंतर मोक्का लावण्यात आला आहे.
ड्रग्जमधून ललितने खरेदी केलेले तब्बल 5 किलो सोने नाशिकमधून जप्त केले आहे. . यापूर्वीही पोलिसांनी 3 किलो सोने जप्त केले होते.