पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे पुणे विद्यापीठात खळबळ निर्माण झाली आहे.संबधित आक्षेपार्ह मजकूर कुणी लिहिला याचा शोध विद्यापीठाकडून सुरु आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मजकूर लिहिल्याने पुणे भाजपच्या वतीने आज निषेध व्यक्त करत विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.
यावेळी डाव्या संघटनांचा असलेला लाल झेंडा पायाखाली टाकून भाजप युवा मोर्चाकडून निषेध करण्यात आला. तसेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर डाव्या संघटनांकडूनही इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग काढण्यात आली होती. यावेळी आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. या घटनेचा अभाविपने निषेध नोंदवला होता. तसेच विद्यापीठाने तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने अखेर आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली.
यावेळी भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. , काही दिवसांपासून विद्यापीठात अशा प्रकारे घटना घडत आहेत. आज
काही समविचारी संघटनांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. विद्यापीठात JNU ची पुनरावृत्ती घडविण्याचे काम काही संघटना करत आहेत.असे त्यांनी म्हंटले आहे.