मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नऊ दिवसांपासून जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु होते राज्यसरकारच्या शिष्टमंडळाबरोबरच्या चर्चेनंतर काल संध्याकाळी मनोज जरांगे पाटलांनी ते उपोषण मागे घेतले आहे. त्यानंतर आज सरकार अॅक्शन मोडवर आलेले असून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक सरकारने बोलावलेली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत तसेच मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावादेखील घेण्यात येणार आहे. कुणबी जातप्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला राज्यभरात वेग देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे.