मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.