आज भारतीय क्रिकेट संघ आपला पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.अशा परिस्थितीत अव्वल दोन संघांमधील हा सामना ‘फायनलपूर्वीचा अंतिम सामना’ मानला जात आहे.
आफ्रिकन संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडविरुद्धचा एक सामना वगळता 6 सामने जिंकले आहेत.तर,टीम इंडियाने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत. तसेच,वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे.
.या सामन्यासाठी भारताने प्लेइंग-11 मध्ये एकही बदल केला नाही.तर दक्षिण आफ्रिकेने फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीचा समावेश केला आहे.
सामन्याच्या सुरवातीला भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.