ड्रग्ज व्यवसायात असणाऱ्या नेत्यांना ठेचून काढले पाहिजे असे विधान राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. जे आमदार, खासदार होतील, त्यांच्या कुटुंबात अमली पदार्थांचं लायसन्स असता कामा नये. यात दुमत असण्याचं काहीही कारण नाही.
काँग्रेसच्या नेत्यांची मी यादी देऊ शकतो ज्यांच्याकडेअसे लायसन्स आहेत असाही आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. मुळात राजकीय नेते, आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नशेच्या पदार्थांचं लायसन्स नसले पाहिजे. तसा नियमच पाहिजे. दारुविक्रीचे परवाने असलेले काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यांची यादीदेखील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ड्रग्ज विषयात कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.