राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुत्रे हलवली आहेत आणि त्यांनी तात्काळ एअर अॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे.
आज संध्याकाळी ७. वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईसाठी आणण्यात येणार आहे. एकनाथ खडसे यांच्या एक जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आज नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान तपासणीवेळी अहवालात काही बदल आढळून आल्याने खडसे यांच्यावर तेथील वैद्यकीय चमूने उपचार सुरू केले. सध्या जळगाव शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.