भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील इडन गार्डनवर होत असलेला सामना विराट कोहलीने खास बनवला आहे. आज त्याचा 35 वा वाढदिवस असून आपल्या वाढदिवसादिवशीच आव्हानात्मक खेळपट्टीवर झुंजार अर्धशतक करत भारताला चांगल्या स्थितीत पोहचवले आहे. विराट कोहलीने श्रेयस अय्यर सोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. याचबरोबर अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत.
फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर विराट कोहलीने सावध फलंदाजी करत आज भारताचा डाव सावरला आहे. विराट कोहलीने अखेर आपले ४९ वे वनडे शतक पूर्ण केले असून वाढदिवसालाच विराट कोहलीच्या बॅटमधून आलेले हे विक्रमी शतक खास ठरले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात ११९ चेंडूत शतक ठोकले आहे .सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ शतके ठोकण्याच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली आहे.
कोहली त्याच्या वाढदिवशी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय ठरला आहे. कोहलीच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनीच त्यांच्या बर्थडेला शतक करू शकले होते.