काल वानखेडे स्टेडियम वर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर ३५७ धावांचे आव्हान ठेवले होते मात्र श्रीलंकेचा अख्खा संघ अवघ्या ५५ धावात गारद झाला. त्यामुळे भारताने हा सामना 302 धावांनी जिंकला. यामुळे श्रीलंका विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडली. मात्र टीम इंडियाने केलेला पराभव श्रीलंकंन क्रीडामंत्र्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.आता श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी टोकाचे पाऊल उचलत, श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेंने विश्वचषकात अतिशय निराशाजनक कामगिरी केली असून सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात श्रीलंकेने केवळ २ विजय मिळवले आहेत.
श्रीलंकेच्या या वाईट कामगिरीमुळे त्यांच्या देशात निदर्शने सुरु झाली आहेत. परिणामी श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने याबाबत निवड समितीला जाब विचारलाच, पण आता त्यापुढे जात थेट क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आहे आणि एक अंतरिम समिती स्थापन केली आहे, ज्याचे नेतृत्व कर्णधार अर्जुन रणतुंगा करणार आहे.