दोनच दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर आता दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाने हादरली आहे. दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
ह्याही भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचे भूकंपशास्त्र विभागानं म्हटले आहे. तसेच याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचे धक्के जोरदार असले तरी पण यामध्ये कुठलेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
तीन दिवसांत भूकंपाची ही दुसरी वेळ आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ६. ४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता ज्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले होते. आज दिल्लीशिवाय उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.