अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराचे प्राणप्रतिष्ठापना होणार असून त्यासाठी घरोघरी अक्षता देऊन या सोहळ्याचे आमंत्रणासाठी अक्षता कलश आज अयोध्या येथील श्रीरामलला मंदिरात विधीवत पूजा करण, आरती करण उडूपी पीठाधीश्वर विश्वप्रपन्नाचार्य जी महाराज विश्वस्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास यांचे हस्ते पश्चिम महाराष्ट प्रांताकरिता विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे प्रांत समरसता सहप्रमुख निखिल कुलकर्णी यांचे कडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपतराय, केन्दीय मंत्री कोटेश्वर, केन्दीय मंत्री गोपाळजी, अयोध्याचे महापौर, विविध आखाड्याचे संत, धर्माचार्य आदी उपस्थित होते.
देशभरातील विश्व हिंन्दू परिषदेच्या ४५ प्रांतातील प्रमुख पदाधिकारी यांचेकडे श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजलेल्या अक्षता कलश, प्रभू श्रीरामाचे छायाचित्र आणि माहितीपत्रक देण्यात आले.
अयोध्येतून दिलेले अक्षतां कलश यांचे पश्चिम महाराष्ट प्रांताच्या २४ जिल्हाचा अक्षता कलश पूजन कार्यकम रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे येथे होणार आहे.
प्रांताचा एकत्रीत पूजन कार्यकम पुणे येथे झालेनंतर जिल्हाशाह अक्षता कलश पूजन कार्यकम होणार आहेत व त्यांनतंर घरोघरी आमंत्रण म्हणून रामभक्ताकडून त्या घरोघरी देण्यात येणार आहेत. अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने ‘माझे गाव माझी अयोध्या’ या संकल्पनेनुसार भाविकांनी आपले गाव, आपला परिसर, घरीदारी धार्मिक अनुष्ठान, नामसंकीर्तन करीत स्थानिक मंदिरात महाआरती, प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवून आनंदोत्सव साजरा करावा. यानिमित्त परिसरात रांगोळ्या, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा; तसेच सायंकाळी घरांसमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा, देशभर १ ते १५ जानेवारी व्यापक जनसंपर्क होणार आहे. २२ जाने २०२४ ला मंदिर केंद्रीत कार्यक्रम सर्व गावात व वस्तीत होणार आहेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन असे आवाहन विश्व हिंन्दू परिषदेचे प्रांतसह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी केले आहे.