राज्यातील चुरशीच्या ठरलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे अर्ध्याहून अधिक निकाल आतापर्यंत जाहीर झाले असून त्यात महायुतीने वर्चस्व गाजविल्याचे समोर आले आहे. २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात महायुतीला सर्वाधिक ११०१ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर मविआला ४७३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुपारच्या तीन वाजेपर्यंतच्या आकडेवारीत २३५९ पैकी १८१० ग्रामपंचायतींचा निकाल लागला आहे. या ग्रामपंचायतीत शिंदे गटाला फायदा झाला असून २२६ ग्रामपंचायती काबिज केल्या आहेत. तर ठाकरे गटाला १०३ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे.
सत्तेत असल्याचा मोठा फायदा महायुतीला झाला आहे. शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रामीण भागात अधिक पसंती मिळाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.