भाजप आणि मोदी सरकारचे काम घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.नमो ११ असे या उपक्रमाचे नाव असून मोदी सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा राबवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ ’ हा उपक्रम राबवला जाणार आहे.
भाजपचे काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत ‘नमो ११’ या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या केला जाणार आहे. यात मुंबई उपनगरे आणि जिल्हात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, आदिवासी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा विकास, शाश्वत विकास या सारख्या ११ विषयांशी संबंधित लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो ११ कार्यक्रमाची घोषणा सप्टेंबर महिन्यात केली होती.