राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच गुजरातमधील भूजमध्ये पार पडली. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचे प्रतिपादन केले आहे.
भारत हिंदू राष्ट्र केव्हा बनणार या पत्रकारांच्या प्रश्नाचा उत्तर देताना होसबळे यांनी भारत हिंदू राष्ट्र आधीही होता, आजही आहे आणि नेहमीच राहणार असे मत व्यक्त केले आहे .भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भारत हे हिंदू राष्ट्र आहेच असे त्यांनी स्पष्ट केले .
यावेळी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांच्या एका ऐतिहासिक वक्तव्याचे उदाहरणही दिले. हेडगेवार म्हणाले होते मी हिंदू आहे असे म्हणणारा एकही व्यक्ती जोवर या भूमीवर आहे, तोवर भारत हिंदू राष्ट्र राहणार आहे.