हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, कडेगावसह इतर भागात पाऊस सुरू आहे. तर काही भागांमध्ये पहाटे पावसाला सुरूवात झाली. कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस बरसला आहे तसेच पुण्यात देखील पावसाचे वातावरण दिसून येत आहे.