भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याला जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर 1 चा मुकुट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या डोक्यावर होता. मात्र, आता शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत नंबर 1 चे स्थान पटकावले आहे
तसेच भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये ८ पैकी ८ सामने जिंकून जागतिक क्रिकेटमधील वर्चस्व दाखवून दिले आहे.आता भारताचा आयसीसी रँकिंगमध्ये देखील जवळपास सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण झाला आहे.
वनडे आयसीसी बॉलिंग रँकिंगमध्ये देखील भारताचा दबदबा आहे. वर्ल्डकपमध्ये भन्नाट गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराजला दोन गुणांचा फायदा झाला असून तो आता अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर कुलदीप यादव चौथ्या आणि जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर पोहचला आहे. तसेच मोहम्मद शामीने टॉप टेनमध्ये स्थान पटकावले आहे.