एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने गट फेरीतील आपले सर्व सामने जिंकले.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ४ बाद ४१० धावा केल्या होत्या . प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ४७.५ षटकात केवळ २५० धावांच करू शकला.या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली
टीम इंडियाचा सामना आता पहिल्या उपांत्य फेरीत १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित ठरला आहे..