वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून पहिला उपांत्य सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ वानखेडे स्टेडिअमवर सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रोहित शर्माने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शानदार फलंदाजी करत भारताला 20 षटकानंतर एक बाद 150 धावांपर्यंत पोचवले.
कर्णधार रोहित शर्मा २९चेंडूत ४७ धावा करून बाद झाला तरी विराट कोहलीने अर्धशतक ठोकत भारताचा डाव सावरला.विराट कोहलीचे महाशतक आणि श्रेयस अय्यसच्या शतकांच्या जोरावर भारताने आज सेमी फायनलचा विजयाचा भक्कम पाया रचला आहे. कोहलीने यावेळी आपले ५० वे शतक साजरे करत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.
कोहलीने यावेळी ११३ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ११७ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. श्रेयसने यावेळी ७० चेंडूंत १०५ धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुलने 20 चेंडूत नाबाद 39 धावा करत भारताला 398 धावांपर्यंत पोहचवले.