गेले काही दिवस देशात मोठ्या प्रमाणात तापमानात घट बघायला मिळते आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरियाणाच्या हिस्सारमध्ये थंडीचा कडाका वाढला असून तापमान १० अंशाच्या खाली आले आहेत. तर राजधानी दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीत १०.९ अंशांवर घसरला. उत्तर भारतातील मैदानी भागात सुरू असलेली बर्फवृष्टि आणि थंड वारे वाढले आहेत. देशात काही भागात थंडी तर काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे हे सक्रिय झाल्यामुळे राज्यात थंडीत वाढ होऊ शकते.