जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असून त्यापैकी तीन जण ठार झाले आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.
हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले जात आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे .
बशीर अहमद मलिक आणि अहमद गनी शेख अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोन्ही घुसखोर पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील रहिवासी होते. दहशतवादी बशीर हा लॉन्च कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे.