राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे.
मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी समाज एकवटला असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ बोलत होते. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ५६ मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत.असे भुजबळ म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर एकाही नेत्याला गावात फिरकू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावरही छगन भुजबळ यांनी निशाणा साधला. गावात नेत्यांना गावबंदी करता. महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे काय?, असा सवाल भुजबळांनी केला आहे तसेच यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल, असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत
लाठीचार्ज झाल्यावर मनोज जरांगे घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी त्याला पहाटे तीन वाजता परत आणून बसवले. त्याला सांगितले की शरद पवारसाहेब येणार आहेत, असे म्हणत भुजबळांनी पवारांवरही निशाणा साधला आहे.