राज्याची दिवाळीनंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयांवर चर्चा झाली.तसेच राज्याची अर्थव्यवस्थेचे १ ट्रिलिअन डॉलर्सचे उद्दीष्ट्य गाठण्याच्या उद्देशानेही आजची बैठक महत्त्वाची ठरली.त्यासाठी विविध 341 शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशींचा सरकारकडून अभ्यास केला जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. तसेच मराठवाड्यासाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील ,धनंजय मुंडे, दादा भुसे, तानाजी सावंत ,विजयकुमार गावीत, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, हे मंत्री उपस्थित होते.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय
मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार ( जलसंपदा विभाग)
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
( ग्रामविकास विभाग)
आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
( उच्च व तंत्रशिक्षण)
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)