पाच राज्यांमध्ये मध्य प्रदेशच्या २३० जागा आणि छत्तीसगडमधील उर्वरित ७० जागांसाठी काल मतदान झाले. छत्तीसगडमधल्या रायपूरमध्ये सर्वात कमी ५८.८३ टक्के मतदान झाले.
मध्य प्रदेशातील सर्व २३० विधानसभा जागांसाठी २,५३३ उमेदवार रिंगणात होते. त्याचवेळी,छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी ९५८ उमेदवारांनी नशीब आजमावले.आता ३ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या मतमोजणीने सर्वांचे भवितव्य ठरणार आहे.
मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपदरम्यान चुरस असणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना निरनिराळय़ा योजनांच्या घोषणांच्या साहाय्याने सत्ता कायम राखण्याची आशा आहे. तर छत्तीसगड मध्ये सत्ताधारी काँग्रेसला पुन्हा विजय मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र भाजपनेही गेल्या निवडणुकीत गेलेली इथली सत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.