मुघलांनी केलेल्या सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात उभे राहिलेले गुरु तेग बहादुर (शिखांचे नववे गुरु) यांची पुण्यतिथी दरवर्षी २४ नोव्हेंबर रोजी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते.
गुरु तेग बहादूर यांचा जन्म २१ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे माता नानकी आणि सहावे शीख गुरु, गुरु हरगोविंद यांच्या पोटी झाला. ज्यांनी मुघलांविरुद्ध सैन्य उभे केले आणि योद्धा संतांची संकल्पना मांडली.
गुरु तेग बहादुर, ज्यांची शिखांनी अनेकदा ” मानवतेचे रक्षक’ (सृष्ट-दी- चादर) म्हणून पूजा केली. प्रेम, सहानुभूती, त्याग, ईश्वर भक्ती, समता, करुणा आणि त्याग यांसारखे मानवी गुण गुरु तेग बहादूर सिंग यांच्यामध्ये होते. श्रद्धा, धर्म आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, म्हणून त्यांना आदराने “हिंद की चादर” म्हटले जाते.
शिखांचे ८ वे गुरु हरिकृष्ण राय जी यांच्या अकाली निधनामुळे गुरु तेग बहादूर जी यांना गुरु करण्यात आले. वयाच्या १४ व्या त्यांनी मुघलांच्या आक्रमणाविरुद्ध, वडिलांसोबतच्या युद्धात आपले शौर्य दाखविले. या शौर्याने प्रभावित होऊन त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव तेग बहादुर म्हणजेच तलवारीचा धनी असे ठेवले.
मुघलांचे अतोनात अत्याचार त्यांनी सहन केले पण इस्लाम धर्म स्वीकारला नाही. सर्व अत्याचारांना पूर्ण निर्धाराने तोंड दिले. गुरु तेग बहादूर यांच्या संयमामुळे संतप्त झालेल्या औरंगजेबाने चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद करण्याचे आदेश दिले. तो दिवस होता २४ नोव्हेंबर १६७५, गुरु तेग बहादूर यांनी धर्मांच्या रक्षणासाठी बलिदान दिले.
त्यांच्या हौतात्म्याच्या ठिकाणी त्यांच्या अनुयायांनी एक गुरुद्वारा बांधला, जो आज गुरुद्वारा शीश गंज साहिब म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २४ नोव्हेंबर हा दिवस गुरु तेग बहादूर शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
सौ.मधुरा मनोज रोझेकर
संदर्भ: गूगल
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र