पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फायटेर प्लेन ‘तेजस’मधून भरारी घेतली. कर्नाटकमधील बंगळूर येथील येलहंका एयरबेसमधून त्यांनी तेजस उडवले. फायटर प्लेनमधून उड्डाण करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
तेजस हे भारताचे ‘मेक इन इंडिया’ फायटर जेट आहे. या विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) केली आहे.पंतप्रधान मोदी यांनी आज बंगळुरुमध्ये या कंपनीला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून हवाई पाहणी केली आहे. आपल्या एक्स हँडलवरुन फोटो शेअर करत पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली आहे.
तेजस हे सिंगल इंजिन असणारे विमान असून या दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात दाखल झाल्या आहेत.