काल झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. . पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात या पावसाने मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, पुण्यातल्या आंबेगावात गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. कांदा आणि बटाटा पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. तर निफाडमध्येही गारपिटीनं झोडपले एसिबी द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. साक्री शिंदखेडा धुळे शिरपूर येथे कापूस हरभरा गहू या पिकांचे नुकसान झाले आहे.गारपिटीमुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होऊन भविष्यात पुन्हा ‘ कांदा ‘ टंचाई निर्माण होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागाने पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे