मराठ्यांना माझा विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे मात्र त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यात निजामशाही होती. तेथील लोकांना त्यावेळी कुणबी म्हणून आरक्षण मिळत होते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्या.शिंदे समितीला मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सोपविले होते. ते योग्य होते. मात्र साऱ्या महाराष्ट्रात आता कुणबी नोंदी शोधण्याची गरज नाही. आता त्याचे काम संपलं आहे म्हणून समितीचं काम बंद करा असे आपण म्हटल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
सरसकट मराठा आरक्षण द्या ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. मराठवाड्यातील वंशावळ चेक करून कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीमध्ये येतात, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले आहे. तसेच खरोखरच जे कुणबी आहेत त्यांनी स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी कुणबी प्रमाणपत्र मिळवले आहे असे ही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.