काल राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे.
अवकाळी पावसाच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत.प्राथमिक आढावा घेऊन नुकसानीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बीची वेगवेगळी स्थिती आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त नुकसान होईल. पण जिथे नुकसान होईल, तिथे मदत होणार”, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.