समितीचा प.महाराष्ट्र प्रांत व कोकण प्रांताचा जिजामातांच्या 350 व्या स्मृतिवर्षानिमित्त 26 नोव्हेंबरला पाचाडला 1000 सेविकांच्या उपस्थितीत सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.
रायगड, 26 डिसेंबर 2023
आधुनिक महाराष्ट्रातील पवित्र “शक्तीपीठ” असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ आईसाहेब ह्यांनी आपला देह ठेवला. त्या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्त राष्ट्र सेविका समितीच्या 1100 सेविकांतर्फे पाचाड येथील राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या समाधी स्थळावर मानवंदना देण्यात आली. तसेच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजदरबारातील स्मारकासमोर घोषवादनासह मानवंदना देण्यात आली.
आज रविवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी श्रीक्षेत्र रायगडावर छत्रपतींना मानवंदना आणि यष्टी प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला. पाचाड येथे सकाळी 10 वाजता समाधी स्थळापासून् कार्यक्रम स्थळापर्यंत महिलांची मानवंदना आणि नंतर जाहीर कार्यक्रम झाला. राष्ट्र सेविका समिति कोकण प्रांत आणि पश्चिम प्रांत, राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे, राजमाता स्मारक समिती. पु च्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1100 महिलांचे एकत्रीकरण, शोभायात्रा, शारीरिक प्रात्यक्षिके आणि मग जाहीर कार्यक्रम, ध्वजारोहण व प्रार्थना झाली. शोभायात्रेत स्थानिक महिला पण सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेमध्ये सेविकांनी सहभाग घेतला.
राजमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजीमहाराजांना घडवले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा दिली. राजमाता जिजाऊंपासून समस्त स्रीशक्तीने प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने हे एकत्रीकरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सीमाताई देशमुख, राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सह कार्यवाहिका चित्राताई जोशी, वक्त्या अश्विनीताई मयेकर ,क्षेत्र कार्यवाहिका सुनंदाताई जोशी, क्षेत्र सह कार्यवाहिका सुनंदाताई जोशी उपस्थित होत्या.
प्रास्ताविक शैलाताई देशपांडे यांनी केले तर परिचय पद्मजाताई अभ्यंकर यांनी करून दिला. यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रविणाताई दांडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सौजन्य – सामिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र