शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांसमोर सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाली.आजपासून सलग पाच दिवस ही सुनावणी होईल. यामध्ये सलग तीन दिवस आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष होणार आहे. अॅड महेश जेठमलानी ३ दिवस उलट साक्ष घेणार आहेत. व्हीप बाबत कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे.
आता ही सुनावणी पुढे काही दिवस चालू राहणार आहे. फक्त १६ दिवस माझ्याकडे या सुनावणीसाठी असून त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त १६ दिवसाचा कालावधी आहे असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते