राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निवडणुक आयोगात आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. सायंकाळी ४ वाजता शरद पवार गटाकडून अपुर्ण राहिलेला युक्तीवाद केला जाणार आहे.
याआधीच्या युक्तिवादात शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर आक्षेप घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नसल्याचा दावा केला आहे. मुळात राष्ट्रवादीमध्ये कोणताही वादविवाद नसताना केवळ सत्तेसाठी अजित पवार यांनी अध्यक्षपदावर हक्क सांगितल्याचा युक्तिवाद मागच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून करण्यात आला होता.
शरद पवार गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवादासाठी आणखी वेळ मागितला होता. निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य केली होती.आज कामत पुन्हा युक्तिवाद करतील. त्यानंतर अजित पवार गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल.