गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व व गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांचे दीर्घकालीन सहकारी चार्ली मंगर यांचे आज निधन झाले ते ९९ वर्षांचे होते. कॅलिफोर्नियातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे सर्वात विश्वासू सल्लागार म्हणून चार्ली मंगर ओळखले जात असत.
बर्कशायर हॅथवे या एकेकाळच्या अपयशी टेक्सटाइल कंपनीला यशाचा राजमार्ग दाखवून त्या कंपनीला चार्ली मंगर यांनी यशाच्या शिखरावर पोचवले होते. याच कंपनीचे ते वाइस चेयरमनही होते. चार्ली मंगर सुमारे 21000 कोटींचे मालक होते.वॉरन बफे यांच्या प्रमाणेच चार्ली मंगर हा गुंतवणूक क्षेत्रातील अखेरचा शब्द होता. मंगर यांनीच बफे यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा मंत्र दिला होता.
कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून वावरत असत . कॉर्पोरेट जगताकडून काही अतिरेक होत असल्यास किंवा गैरवर्तन होत असल्यास ते त्याचा थेट विरोध करायचे.