मराठा आरक्षणाच्या विरोधात गेले काही दिवस राज्यसरकारमध्ये असलेले मंत्री छगन भुजबळ आपली थेट भूमिका मांडत आहेत . त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, यावरूनच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट भुजबळ यांच्यावर निशाणा साधत त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आज लोक त्यांच्याबाबत आदराने बोलत आहेत. उद्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करतील असेही विखे पाटील म्हणाले आहेत. म्हणाले. कोल्हापूर दौऱ्यावर असतांना विखे यांनी माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी संयम बाळगला पाहिजे. त्यांच्या विधानांमुळे मंत्रिमंडळात एकवाक्यता नाही, असा समज पसरतो. त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावे; अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत वेगळा विचार केला पाहिजे. समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशी विधाने कोणीच करू नयेत,’ असे स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. .