बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गँगकडून फेसबुकच्या माध्यमातून धमकी मिळाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे.
रविवारी बिश्नोईने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक पोस्ट करणारा हा भारताबाहेरील असून पोस्ट शेअर करत त्याने असे लिहिले होते की, ,तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता तुमच्या भावाला वाचवण्याची वेळ आली आहे. हा मेसेज सलमान खानसाठीही आहे – दाऊद तुम्हाला वाचवेल, तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही या भ्रमात राहू नका.
यापूर्वी मार्च महिन्यामध्ये सलमानला बिश्नोई गँगच्या एका सदस्याकडून धमकीचा मेल आला होता. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली होती. तर, याप्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयए तपास केलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे.