राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टाफचा कालावधी वाढवण्यात आला आहे. वनडे विश्वचषका 2023 च्या फायनलनंतरराहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. बीसीसीआयने राहुल द्रविड याला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती. राहुल द्रविड यानेही ही ऑफर स्विकारली आहे.
तर व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए प्रमुख म्हणूनच काम पाहणार आहे. त्याशिवाय तो स्टँड इन मुख्य कोच असेल. म्हणजेच, राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला धडे देणार आहे.
यानंतर राहुल द्रविड म्हणाला की, “टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे अविस्मरणीय राहिली आहेत. आम्ही एकत्रपणे चढ-उतार पाहिले आहेत आणि या संपूर्ण प्रवासात संघातील पाठिंबा आणि विश्वास कायम आहे.माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या दूरदृष्टीला पाठिंबा दिल्याबद्दल आणि या मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.