बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. ते आज ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
डॉ. काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाविरोधात डॉ. काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता.